जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार ‘हे’ पाऊल

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यात जातीच्या नावाने असलेल्या वस्त्यांची नावे बदलण्याच्या सूचना समाजिक न्याय विभागाच्या बैठकीत दिल्या. मुंबई येथे शुक्रवारी पवार यांच्या नेतृत्वात प्रदेश कार्यालयात बैठक झाली. या बैठकीदरम्यान पवार बोलत होते.

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, ‘राज्यात कुठेही जातीच्या नावाने वस्ती नको. त्यांची नावे बदलावीत. अशा सूचना देताना एक संघटन उभं करून अन्याय होणाऱ्या घटकांच्या पाठिशी उभं राहावे. त्यांना न्याय मिळवून द्यायची व्यवस्था करावी,’ असे पवार म्हणाले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थित होती.

Loading...

तसेच या बैठकीत जयंत पाटील म्हणाले, अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. धनंजय मुंडे चांगले संघटक आहे. त्यामुळे ते समाजातील सर्वच घटनकांना न्याय देतील, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान, या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, न्याय विभागाचे प्रमुख जयदेव गायकवाड आदी उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण