fbpx

जयंतराव विधानसभा निवडणुकीत विजयासाठी वाट्टेल ते करा – अजित पवार

ajit pawar

पुणे: जयंत पाटील यांची ख्याती फिरकी गोलंदाज म्हणून आहे. ते गुगली मधेच टाकतात , जस रोहित शर्माने कॅप्टन खेळी करून आयपीएल मध्ये मुंबईला जिवंत ठेवलं तस आमच्या कॅप्टन ने विधानसभेत आम्हाला विजय संपादन करून घ्यावे त्यासाठी वाट्टेल ते करा, असं आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पुण्यात बोलताना केलं आहे.

पुण्यामध्ये आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं , यामध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी जयंत पाटील यांच्या नावाची एकमुखाने घोषणा करण्यात आली आहे, तर उपाध्यक्ष म्हणून नवाब मलिक, खजिनदारपदी हेमंत टकले, सरचिटणीसपदी शिवाजीराव गर्जे यांची निवड करण्यात आली याप्रसंगी पवार बोलत होते.

नेमकं काय म्हणाले अजित पवार

जयंतराव तुमच्यावर आता ही अध्यक्ष पदाची जबाबदारी आहे.पदाधिकारी करत असताना नव्या चेहऱ्यांना संधी द्या. जयंत पाटील यांची ख्याती फिरकी गोलंदाज म्हणून आहे. ते गुगली मधेच टाकतात , जस रोहित शर्माने कॅप्टन खेळी करून आयपीएल मध्ये मुंबईला जिवंत ठेवलं तस आमच्या कॅप्टन ने विधानसभेत आम्हाला विजय संपादन करून घ्यावे त्यासाठी वाट्टेल ते करा

दरम्यान, याच बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. लोकसभेच्या निवडणुकीत काय होईल माहीत नाही पण तुमच्या आमच्या मनातील साहेबांच्या प्रति जे स्वप्न आहे ते कदाचित नियती पूर्ण करेल त्यासाठी आपण काम करावं असं म्हणत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला.