fbpx

‘युती बाबत विचार करू नका निवडणुकीच्या कामाला लागा’

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. तर शिवसेनेने येत्या निवडणुकीची जय्यत सुरवात केली आहे. ‘युती बाबत विचार करू नका निवडणुकीच्या कामाला लागा’ अशा सूचना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्या. आज मातोश्रीवर सकाळी 11 वाजता शिवसेनेच्या सर्व खासदारांची उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. तसेच पक्षाचे पदाधिकारी, अनिल देसाई , आदेश बांदेकर , मिलिंद नार्वेकर अन्य नेते देखील उपस्थित होते.

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना ‘युती होईल किंवा नाही होईल याची चिंता करू नका. तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा’ अशा सूचना दिल्या आहेत. तसेच ठाकरेंनी यावेळी जिथे शिवसेना पक्ष कमजोर आहे अशा ठिकाणी पक्ष मजबूत करा अशी सूचना देखील केली.

दरम्यान उद्धव ठकरे यांनी युतीबाबत खासदारांची चाचपणी देखील केली. युती झाली नाही तर तुम्ही लढणार ना ? असा सवाल उपस्थित शिवसैनिकांना विचारला असता सर्व शिवसैनिक हो म्हणाले. तर युती झाली तर लढणार का? असा सवाल विचारला असता सर्व शिवसैनिक मोठ्याने हो म्हणाले.

तसेच भाजपसाठी प्रचारातील चाणक्य ठरलेले प्रशांत किशोर यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यामुळे शिवसेना भाजप युती होईल कि काय असे वातावरण सर्वत्र तयार झाले होते. अद्याप शिवसेना भाजप युतीबाबत अस्पष्टता कायम आहे.

1 Comment

Click here to post a comment