fbpx

… अन्यथा कायदा हातात घेऊ – जितेंद्र आव्हाड

jitendra awhad

ठाणे – जोपर्यंत मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंयत ऐरोली आणि मुंबईला जाणार टोल बंद करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी केली आहे. दुरुस्तीच्या कामामुळे वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हा टोल बंद करण्यात यावा टोल बंद न केल्यास कायदा हातामध्ये घेऊन स्वतः टोल बंद करू, असं आव्हाड यांनी म्हंटल आहे.

दोन वर्षांपूर्वी मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामांसाठी पाठपुरावा करूनही शासनाने या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे शहरातील वाहतूक समस्येकडे शासन आणि ठाण्यातील सत्ताधाऱ्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले असल्याचा आरोप देखील यावेळी आव्हाड यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला.

मंगळवारपासून मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे होणारा वाहतूक कोंडीचा फटका मात्र ठाणे आणि नवी मुंबईच्या वाहनचालकांना होत आहे. दोन महिने हे दुरुस्तीचे काम सुरु राहणार असल्याने दोन महिने आता ठाणेकरांना तसेच नवी मुंबईच्या वाहनचालकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे.त्यामुळे टोल बंद करावा अशी मागणी त्यांनी केली.