fbpx

शास्त्रज्ञांचं श्रेय तुम्ही घेऊ नका: राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा:आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन ‘शक्ती’ सफल झाल्याची घोषणा केली. अवकाशातील उपग्रह क्षेपणास्त्राच्या साह्याने पाडून मिशन ‘शक्ती’ ३ मिनिटात पूर्ण झाले. शास्त्रज्ञांच्या या कामगिरीवर संपूर्ण देशाला गर्व आहे. देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शास्त्रज्ञांच अभिनंदन केल आहे. यासोबतच नरेंद्र मोदींवर टीकाही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संभोधित करून ही बातमी सांगायची काय गरज. शास्त्रज्ञांच कर्तृत्व त्यांना सांगू द्या, त्यांना प्रसिद्धी मिळू द्या अश्या आशयाचं ट्वीट करत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

1 Comment

Click here to post a comment