ज्यांनी तोडफोड केलीय त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊ नका : मराठा क्रांती मोर्चा

टीम महाराष्ट्र देशा : ज्या कंपन्यांची तोडफोड झाली आहे, त्या कंपन्यांतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी द्यावं, आंदोलनात तोंड बांधून तोडफोड करण्यात आली. यापूर्वी कोणीही तोडफोड केली नाही, मग आताच का झाली? तोडफोडीची सीआयडी चौकशी करा तसेच ज्यांनी तोडफोड केलीय त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊ नका अशी मागणी औरंगाबाद येथील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली आहे.

औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेवून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आपली भूमिका जाहीर केली. हल्ले करणारे आम्ही नाहीच, असं कृत्य कोणताही मराठा करणार नाही. वळूज एमआयडीसीतील तोडफोड केवळ एमआयडीसीची नाही तर अस्मितेची तोडफोड, त्या घटनेचा निषेध, संपूर्ण घटनेची सीआयडी चौकशी करा. कालच्या तोडफोडीच्या घटनेचा निषेध, निंदा करतो, मराठा मोर्चा बदनाम होऊ नये म्हणून सीआयडी चौकशीची मागणी करतो असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Loading...

पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

  • ज्यांनी तोडफोड केलीय त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊ नका : मराठा मोर्चा
  • तोडफोड करणारे मराठा मोर्चाचे नाहीत, त्यांचा आमच्याशी संबंध नाही : मराठा मोर्चा समन्वयक
  • मराठा आंदोलकांनी संयम ठेवावा, मराठा मोर्चा समन्वयकांचं आवाहन
  • आम्ही चोर नाही, सत्य बाहेर येऊ द्या, सर्वोच्च चौकशी करा : मराठा मोर्चा
  • राष्ट्रगीत गाऊन आंदोलनाची सांगता केली, मग तोडफोडीचा प्रश्नच येत नाही : मराठा मोर्चा समन्वयक
  • आम्ही शांततेने मोर्चे करणारे आहोत, तोडफोड करणारे नाहीत, आम्ही सर्वजण जाऊन MIDC मधील कंपनीचालकांना भेटणार: मराठा मोर्चा
  • मराठी क्रांती मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत आहे : मराठा मोर्चा समन्वयक
  • आम्ही प्राण देणारे आहोत, पण आमच्यावर हिंसेचा आरोप होत आहे : मराठा मोर्चा समन्वयक
  • 15 ऑगस्टपासून अन्नत्याग आंदोलन : मराठा मोर्चा
  • 15 ऑगस्टला एक वेळ चूल बंद आंदोल करणार : मराठा मोर्चा समन्वयक
Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले