fbpx

‘युतीच्या भांडणात राज्याचं आरोग्य खराब करु नका’

ajit pawar

टीम महाराष्ट्र देशा – राज्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर होती, आता परिस्थिती आणखी बिकट आहे. पण या सरकारला जाग कधी येणार? युतीच्या भांडणात राज्याचं आरोग्य खराब करु नका, असा सल्लाच अजित पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे. आपल्या ट्विटरवरून अजित पवार यांनी हा सल्ला दिला आहे.

अजित पवार म्हणाले की, ‘वारेमाप घोषणा हे सरकार करतं, पण महाराष्ट्राच्या आरोग्याकडेच दुर्लक्ष केलं जात आहे. आधी आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर होती, आता परिस्थिती आणखी बिकट आहे. पण या सरकारला जाग कधी येणार? युतीच्या भांडणात राज्याचं आरोग्य खराब करु नका.’

दरम्यान, आरोग्य विभागाचा अतिरिक्त कारभार सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आहे. आरोग्य विभागातील समस्यांचा डोंगर पाहता हा अतिरिक्त भार शिंदे यांना कसा पेलता येईल, असा प्रश्न जनआरोग्य अभियानाच्या शकुंतला यांनी राज्य सरकारला विचारला आहे.