सर्दी खोकल्याची औषधे विकू नका ; FDA च्या सूचना

cough cold

नागपूर : वातावरणातील बदलामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे घरोघरी रुग्णांची संख्या वाढली असून, चाचणीच्या भीतीने लोक घरीच उपचार घेत असल्याचे वास्तव आहे. योग्य उपचार न मिळाल्याने गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

याच पार्श्वभूमीवर FDA ने नागपूर ड्रगिस्ट आणि फार्मासिस्ट असोसिएशनला सर्दी खोकल्याची औषधे न विकण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नागपूर शहरामध्ये कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळेच FDA ने हे कडक निर्देश देलेले आहेत.

नागरिकांच्या या बेफिकिरीमुळे कोरोनाचा फैलाव होत असून, वेळीच चाचणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. शहरात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. मात्र अनेक जण चाचणीच्या भीतीने घरीच उपचार घेत असल्याचे वास्तव आहे. कोरोनाच्या भीतीने लोक चाचणी टाळत आहेत.

त्यामुळे सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनादेखील गंभीर लक्षणे आढळून येत आहेत. साधा ताप, सर्दी असा समज घे‌ऊन घरीच उपचार करणारे रुग्ण कुटुंबातील इतर सदस्यांच्याही संपर्कात येत आहेत. कुटुंबातील लोक घराबाहेरील इतर लोकांच्या संपर्कात येत असल्याने कोविडच्या संसर्गाची साखळी निर्माण होत आहे. नागरिकांच्या या बेफिकिरीमुळे कोरोनाचा फैलावही वाढत आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाच्या सहकार्याची गरज असून, लक्षणे दिसताच कोविडची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या