‘धोनी तू निवृत्ती घेण्याची घाई करू नकोस’

टीम महाराष्ट्र देशा : विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवानंतर भारतीय संघात कमालीचे वाद निर्माण झाले आहेत. तर भारताचा यष्टिरक्षक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृतीच्या चर्चांनी जोर पकडला आहे. तर एम एस धोनीचे लहानपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी धोनीने निवृत्ती घेण्याची घाई करू नये, असे मत व्यक्त केले आहे.

विश्वचषकातील धोनीच्या संथ गतीच्या खेळामुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला, असे अनेकांनी पराभवाची समीक्षा करताना म्हंटल आहे. त्यामुळे धोनीने आता निवृत्त व्हावं, असा सल्ला बीसीसीआयकडून देण्यात आला आहे. मात्र धोनीने अजूनही निवृत्ती घेऊ नये असे अनेकांचे म्हणणे आहे. तर आता खुद्द प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी धोनीने 2020चा टी-20 वर्ल्डकप खेळावा आणि त्यानंतर निवृत्ती घोषित करावी, अशी भूमिका मांडली आहे.

टी 20 बाबत बॅनर्जी म्हणाले की, महेंद्रसिंग धोनीने टी २० क्रिकेट खेळणे चालू ठेवायला हवे. एकदिवसीय क्रिकेट हे थोडेसे कठीण असते. कारण या वयात पूर्ण ५० षटके मैदानावर उभे राहून यष्टिरक्षण करायचे आणि त्यानंतर फलंदाजीदेखील करायची, ही बाब शारीरिकदृष्ट्या थोडी आव्हानात्मक आहे. त्यातही गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या दोन्ही बाबींकडेही लक्ष देत त्यांना सल्ला देणे हे कामदेखील धोनी करत असतो. त्यामुळे धोनी मैदानावर प्रत्येक मिनिटाला कामाने व्यापलेला असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले