कोकणामध्ये मत्स्यव्यवसाय विद्यापीठाची आवश्यकता नाही : जानकर

blank

रत्नागिरी : कोकणामध्ये मत्स्य विज्ञान विद्यापीठाची आवश्यकता नाही असे संतापजनक उत्तर विधान परिषदेतील तारांकित प्रश्नाला दिलेल्या मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांच्या वक्तव्याबद्दल सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पुन्हा एकदा कोकणाला सापत्न वागणूक दिली जात आहे, शिरगावचे मत्स्यविज्ञान महाविद्याय नागपूरला न जोडल्याने हे आकसापोटी होत असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य नागरीकांमधून व्यक्त होत आहेत तर लोकप्रतिनिधीही याबाबत आक्रमक झाले आहेत.

भाजप सरकारने एकही नवी योजना कोकणात आणली नाही. मत्स्यव्यवसाय विद्यापीठ कोकणात आणावं अशी मागणी गेली पाच वर्ष आम्ही करत आहोत. तरी हे सरकार कोणतीच हालचाल करत नाही. महादेव जानकर म्हणतात की कोकणात विद्यापीठ काढायची गरज नाही. मग कोकणाला न्याय कोणी द्यायचा? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.