fbpx

अण्णांच्या जीवाशी खेळू नका,शिवसेना पक्षप्रमुखांचा सरकारला इशारा

टीम महाराष्ट्र देशा : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे विविध मागण्यासांठी 5 दिवसांपासून राळेगण सिद्धीमध्ये उपोषण सुरु आहे. आता त्यांच्या समर्थनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले आहेत.अण्णांच्या जीवाशी खेळू नका, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.त्यांचे प्राण महत्त्वाचे असून राज्य सरकारने त्यांच्या जीवाशी खेळू नये, असे आवाहन ठाकरे यांनी पत्रातून केले आहे.

दरम्यान, अण्णा हजारे गेल्या पाच दिवसांपासून आपल्या गावी राळेगणसिद्धी या ठिकाणी आमरण उपोषण सुरु केले आहे. अण्णांची प्रकृती दिवसेंदिवस खराब होऊ लागली आहे.अण्णांचा रक्तदाब सतत कमी जास्त होत आहे. त्यांच्या किडनीतील रक्तपुरवठा कमी होतोय. त्यामुळे अण्णांनी उपोषण सुरु ठेवल्यास ही आत्महत्या असेल, अशी प्रतिक्रिया अण्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

लोकपाल, लोकायुक्त, शेतीमालाला हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी अण्णा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.