शेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर

जळगाव : गुलाबराव पाटील यांनी परभणी येथील सभेत पाटील यांनी शेतकऱ्यांची खिल्ली उडविली होती. अशा मंत्र्यांना आता फिरू देवू नका, अशी टीका माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सहकार राज्यमंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केली. ते जळगाव येथील राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेत बोलत होते.

यावेळी देवकर म्हणाले की, ‘शेतकऱ्याबाबत त्यांना जनतेने चौकात प्रश्न विचारावेत आपण शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा चालू आहे. या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेशी सवांद साधला जात आहे.

माजी मंत्री गुलाबराव देवकर हे सहकार राज्यमंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना म्हणाले, गुलाबराव पाटील यांनी परभणी येथील सभेत पाटील यांनी शेतकऱ्यांची खिल्ली उडविली होती. अशा मंत्र्यांना फिरू देवू नका, शेतकऱ्याबाबत त्यांना जनतेने चौकात प्रश्न  विचारावेत आपण शेतकऱ्यांच्या सोबत आहोत.