नका करू क्रांती ‘आंतरजातीय’ विवाहाने येईल शांती ; रामदास आठवले

आठवले

टीम महाराष्ट्र देशा : भीमा कोरेगाव प्रकरणी राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना लक्ष करत आहेत. या प्रकरणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले म्हणाले समाजात स्थिरता निर्माण करायची असेल तर क्रांतीचा मार्ग उपयोगाचा नाही यावर शांततेने मार्ग काढणे गरजेचे आहे. तसेच समाजात परिवर्तन आणायचे असेल तर आंतरजातीय विवाह हाच चांगला मार्ग आहे. बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी ब्राम्हण समाजाची होती. माझी पत्नीही ब्राम्हण आहे. यामुळे समाजात एकोपा येतो.

Loading...

रिपब्लिकन पक्षात सर्वजाती-धर्माचे लोक आहेत. रामदास आठवलेंनी महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेला पाठींबा दिला आहे. समाजात बदल गरजेचा असून दलित अत्याचार या विषयावरून जातीय राजकारण करू नये. वेंकया नायडू यांची जात वेगळी आहे माझी जात वेगळी आहे मात्र, आम्ही एका ठिकाणी खातो, पितो. हे बदल आता झाले आहेत. नाहीतर एक काळ होता ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर शाळेमध्ये आत जाऊन शिकू शकत नव्हते. बाबासाहेबांच्या विचाराने चालत असून सर्व जाती-धर्मांना जोडणे माझे काम आहे.Loading…


Loading…

Loading...