Ajit Pawar मॅच फिक्सिंग केल्यास त्याचा अजरूद्दीन करेन – अजित पवार

माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना  इशारा

पुणे : सध्याचे सत्ताधारी आधी विरोधक होते त्यावेळी त्यांनी काही गोष्टीमध्ये आपल्या सत्ताकाळात मदत केली असेल . म्हणून आता भाजपला मदत करून पुणेकरांच्या प्रश्नावर मॅच फिक्सिंग केल्यास त्याचा अजरूद्दीन करेन तसेच त्या व्यक्तीला घरचा रास्ता दाखवू . असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडच महापालिका निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आज प्रथमच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मेळाव्यात संवाद साधला

अजित पवार म्हणाले की, मध्यावधी निवडणुकांची भाषा केली जात आहे. मात्र, माझा पंधरा वर्षांचा अनुभव पाहता मध्यावधी निवडणुका होऊ दिल्या जाणार नाहीत. तब्बल पंधरा वर्षांनी भाजप शिवसेना सत्तेवर आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या वेळी भाजप अन् शिवसेनेने एकमेकांवर टीका केली. वाघाच्या घशात हात घालून दात मोजू, वगैरे भाषा करण्यात आली. मात्र, ही केवळ बोलाची कढी असल्याची टीका त्यांनी भाजप – शिवसेनेवर केली आहे.