fbpx

बळजबरीने जमिनी घेण्याचा प्रयत्न केला तर बुलेट ट्रेनचे रुळ उखडून टाका – राज ठाकरे

टीम महारष्ट्र देशा : बुलेट ट्रेनसाठी वसई आणि पालघरच्या जनतेनं जमीन देऊ नये, जर बळजबरीने जमिनी घेण्याचा प्रयत्न केला तर बुलेट ट्रेनचे रुळ उखडले जातील असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्राच्या दौऱ्याला वसई इथून सुरुवात केली. वसई इथं झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह फडणवीस सरकारवर सडकून टीका केली.

राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

-आज ट्विटरवर मी एक चित्रफीत टाकली आहे ज्यात १९६० साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य झाल्यावर मराठी माणसांनी कसा जल्लोष त्या चित्रफितीत दिसतोय. तो जल्लोष पाहून माझ्या अंगावर रोमांच उभं राहिलं

-महाराष्ट्राला काय तेजस्वी इतिहास आहे. आज ट्विटरवर जुना व्हिडीओ पाहिला, अंगावर रोमांच उभं राहिलं. आज काय परिस्थिती आहे? कुठे आहे महाराष्ट्र? आज महाराजांनाही वेदना होत असतील – राज ठाकरे

-औरंगजेब शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील महाराष्ट्रात आला होता, शिवाजी महाराज नावाचा विचार मारायला आला होता, पण ते त्याला शक्य झालं नाही पण आज मराठी समाज जातीजातीत विभागला गेलाय, तो एकमेकांशी जातीवरून भांडतोय

-आज जाती पातीत महाराष्ट्राला विभागलाय. ज्या महाराजांनी अवघा महाराष्ट्र एक केला, तोच महाराष्ट्र आज विभागलाय. काय वाटत असेल आपल्या छत्रपतींना – राज ठाकरे

-आपण जातीपातीवरून भांडतोय आणि त्यामुळे बाहेरून आलेल्यांचं फावतंय.

-आरक्षण मुळात लागतं कशाला? फक्त शिक्षणात आणि सरकारी नोकरीत. खासगी क्षेत्रात आरक्षण नाही. सरकारी नोकऱ्या फक्त 5 टक्के. या पाच टक्क्यांसाठी आपण भांडतोय – राज ठाकरे

-मराठी शाळा बंद करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला, काय सरकार आहे! – राज ठाकरे

-आरक्षणाच्या नावावर भांडत असताना, बाहेरून आलेल्यांमुळं निर्माण झालेलं संकट आपण विसरलोय – राज ठाकरे

-वसईत उत्तरप्रदेश आणि बिहार मधून आलेल्यांनी बांधलेल्या चाळींचा विषय मी पाडवा सभेत मांडला, नंतर कारवाईचं नाटक सुरु झालं आणि कारवाई केली तर मराठी माणसांच्या जमिनींवरच्या चाळींवर,परप्रांतीयांच्या चाळींवर का नाही?कुंपणच शेत खातंय

-नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत, भारताचे नाहीत – राज ठाकरे

-नरेंद्र मोदीं हे गुजरातचे पंतप्रधान, भारताचे नाहीत. त्यांना पहिले गुजरातचा विचार येतो तर मग राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा विचार केला तर संकुचित का ठरवलं जातं? – राज ठाकरे

-नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत तर गुजरातचे पंतप्रधान आहेत. प्रत्येक गोष्टीत त्यांना अजून देखील गुजरात आठवतो. जर पंतप्रधान होऊन देखील मोदी गुजरातला विसरू शकत नाही तर मग महाराष्ट्रावर प्रेम करणारा राज ठाकरे संकुचित कसा?

-गुजरातच्या लोकांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे -राज ठाकरे

जर पंतप्रधान होऊन देखील मोदी गुजरातला विसरु शकत नाहीत, तर मग महाराष्ट्रावर प्रेम करणारा राज ठाकरे संकुचित कसा? – राज ठाकरे

-देवेंद्र फडणवीस हे बसवलेले मुख्यमंत्री आहेत, ते काय निर्णय घेणार, मोदी आणि शहा जे सांगणार त्याला हे मान डोलावणार

-फडणवीस म्हणजे रामदास पाध्ये यांचं बाहुलं – राज ठाकरे

-महाराष्ट्रात ४ लाख शौचालयं बांधली असले फुटकळ दावे मुख्यमंत्र्यांनी केले, महाराष्ट्रात पाणी नाही तरी पण असले दावे मुख्यमंत्री करत आहेत

-महाराष्ट्राचं वाळवंटीकरण होत आहे आणि मुख्यमंत्री म्हणतायेत, एक लाख विहिरी बांधल्या – राज ठाकरे

-मुख्यमंत्री म्हणाले १ लाख २० हजार विहिरी बांधल्या, बहुदा मुख्यमंत्री रस्त्यावरचे खड्डे पण विहीर म्हणून मोजत असणार

-नरेंद्र मोदींनी लंडनमध्ये जावून भारतीय डॉक्टरांचा अपमान केला – राज

-नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान व्हावेत, असे म्हणणारा या देशातील पहिला माणूस मी होतो – राज ठाकरे

-मोदींएवढा माणूसघाण्या माणूस बघितला नाही – राज ठाकरे

-नोटा छापायच्याच होत्या, तर कॅशलेस इंडिया हे काय प्रकरण आहे? – राज ठाकरे

-एटीएममध्ये नोटा संपल्यात, भारत सरकार सांगतंय नोटा छापण्यासाठी शाई संपलीये, हे काय वाण्याचं दुकान आहे का ? – राज ठाकरे

-तुम्हाला सगळ्यांना गृहीत धरायला लागलेत. तुमच्या मुलांच्या करता उत्तम शिक्षण नाही, आरोग्य व्यवस्था नाही, तुम्हाला नोकऱ्या मिळोत न मिळोत याचं या सत्ताधाऱ्यांना किंवा मागच्या सत्ताधाऱ्यांना काहीच घेणंदेणं नाही.

-मराठी माणसाच्या मनगटातल्या ताकदीला काय झालं, असे बुळबुळीत का वागताय, कोणीही यावं मराठी माणसावर वरवंटा फिरवावा हे आपण का खपवून घेतोय

-नाणार मध्ये प्रकल्प येणार आहे, हे कोकणातल्या आपल्या लोकांना माहित नाही पण गुजरातच्या काही लोकांना नाणार मध्ये रिफायनरी येणार हे कसं कळतं? त्यांना जमिनी घ्या, मग प्रकल्प आल्यावर मोठ्या फायद्यासाठी विका हे कोण सांगत यांना?

-जगातल्या सगळ्या लढाया या जमिनीसाठी झाल्यात. आज कोकणातील मराठी माणूस, ठाण्यातील मराठी माणूस आपल्या जमिनी चार पैश्यांकरता फुकून टाकतोय. उद्या तुमच्या जमिनी जातील. इंच इंच जमीन विकली जाईल आणि आपल्याच राज्यात बेघर होऊ.

-महाराष्ट्रात इथे पालघर मध्ये गुजराती पाट्या का लागतात? इथे बाहेरून येऊन राहिलेल्याना गुजराती पाट्या लागतात कशाला?

-बाहेरून आलेल्या लोकांनी इथं शहाण्यासारखच राहावं, नाही तर मी हे बोलतच राहणार आणि असंच काम करत राहणार – राज

-मराठी बांधवानो भगिनींना माझी विनंती आहे की बेसावध राहू नका. चिमाजी अप्पांच्या भूमीत आपण जमलो आहोत. चिमाजी अप्पांचं शौर्य तुम्ही दाखवा

-बुलेट ट्रेन आणि एक्सप्रेस वे साठी जमीनी देवू नका, जबरदस्ती केली तर रूळही उखडून टाका – राज