दूध दरवाढीवर तोडगा नाहीच; पुण्यात दूध कोंडी होण्याची शक्यता

पुणे : दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन केले जात आहे, आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. गेली तीन दिवस सुरळीत सुरू असणाऱ्या दूध पुरवठ्याचा आता तुटवडा जाणवू लागला आहे. पुण्यात चितळेसह कात्रज डेअरीचे दूध देखील आज बंद आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देत ते थेट त्यांच्या खात्यात देण्याची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली होती, सरकारकडून संघटनेच्या मागणीवर तोडगा काढण्यात न आल्याने मागील चार दिवसांपासून राज्यभरात दूध आंदोलन छेडण्यात आले आहे. याचा परिणाम दिसण्यास सुरुवात झाली असून मुंबई, पुण्यामध्ये दुधाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कात्रज दूध संघात रोज दोन ते अडीच लाख लिटर दुध संकलन केले जाते.मात्र, दूध बंद आंदोलनामुळे गेल्या तीन दिवसांत दूध संकलन कमी होत होते. त्यामुळे आज ग्राहकांना काही प्रमाणात दूध वितरित केली आहे. मात्र, काही नागरिकांना दूध मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत.

आज पुण्यात चितळेसह कात्रज दूध पूर्णपणे बंद झाले आहे.कात्रज डेअरीचे दररोज 2 लाख सहा हजार लिटर दुध संकलन होते. यामध्ये ग्राहकांना एक लाख तीस हजार लिटर दुध वितरीत केलं जातं. उरलेल्या दुधाचे इतर पदार्थ बनवले जातात. पण आता दुग्धजन्य पदार्थ बनवणे देखील बंद करण्यात आले आहेत.

पोलिसांनी बळाचा वापर केला, तर सहन करणार नाही – राजू शेट्टी

चंद्रकांत पाटलांसारखे कित्येक मंत्री-संत्री आले गेले – राजू शेट्टी.

Loading...