‘राजकीय मतभेद असले तरी, सोशल मिडीयावर महिलांचा अवमान करू नका’

blank

टीम महाराष्ट्र देशा – आज सर्वत्र जागतिक महिला दिन उत्साहात साजरा होत आहे.स्त्री शक्तीचा जागर सर्वत्र होत आहे.सावित्रीबाई च्या लेकी उंच भरारी घेत असून,वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवत आहेत .जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वाना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडीयावर महिलांची बदनामी करण्यासाठी जी शेरेबाजी केली जाते त्याविरोधात आवाज उठवला आहे. आज महिला दिनी, या ट्विटरच्या मंचावर सर्वांनी असं ठरवावं की कितीही राजकीय मतभेद असले तरी, आम्ही महिलांना कोणत्याही स्वरूपाच्या अश्लील, असभ्य आणि स्त्रीत्वाला अवमानकारक टिप्पण्या करणार नाही, त्याला लाईक अगर रिट्विट करणार नाही आणि कोणी असं केल्यास विरोध करु असं आवाहन त्यांनी केलं आहे.