‘देशाला बदनाम करू नका ; मनमोहन सिंगांनी कारवाई केली, तुम्हीही कारवाई करा’

nawab malik

मुंबई : सध्या पेगासस स्पायवेअरची सगळीकडेच चर्चा आहे. इस्त्रायलच्या एनएसओ या फर्मवेअरने तयार केलेलं पेगासेस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. इस्रायली फर्म पेगाससद्वारे आपल्या देशातील काही मंत्री तसंच पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आले असल्याचा दावा करण्यात येतोय.

यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन फोन टॅपिंगवरून तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवरच आरोप केले. तसेच काँग्रेसच्या काळात आणि विविध राज्यांमध्ये विविध सरकारांच्या काळात फोन टॅप कसे केले गेले, याची माहितीही दिली. भारतीय संसदेच अधिवेशन डिरेल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून होतोय. असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. मनमोहन सिंगांच्या काळात कारवाईही करण्यात आली होती. तुम्हीही कारवाई करा, असं आव्हानच नवाब मलिक यांनी फडणवीसांना दिले आहे. नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं आहे.

मनमोहन सिंग यांच्या काळातही फोन टॅपिंग झाल्याचा दावा भाजप करत आहे. पण मनमोहन सिंग यांच्या काळात झालं तेव्हा त्यांनी ज्यांनी हे प्रकार केले त्यांच्यावर कारवाईही केली. आता केंद्र सरकारने या प्रकरणी कारवाई करावी. नुसतं देशाला बदनाम करण्याचा कट आहे असा दावा करू नये, असा टोला मलिक यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP