मराठा समाजाच्या संस्थेला बंद पाडू नका : अमित घाडगे पाटील

पुणे : मराठा समाजातील तरूणांचे भवितव्य असलेली, महाराष्ट्रामधील अनेक तरूणांना शैक्षणिक मद्दत करणारी सारथी संस्था आहे. संस्थेबद्दल गेले अनेक दिवसापासून सरकार ने बिनबुडाचा आरोप करत त्या संस्थेमधील कामकाज बंद करून येणारे बजेट थांबून मराठा समाजाचे मोठे नुकसान केले आहे. गेले चार दिवस झाले संस्थेतील तारादूत बेमुद्दत अंदोलन करत आहेत. अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्य समन्वयक अमित घाडगे पाटील आयणी दिली. यावेळी त्यांच्यासोबत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यादेखील होत्या.

यावेळी बोलताना घाडगे म्हणाले, ‘आज पुणे येथे आंदोलन करणाऱ्या तारादूतांना पाठींबा देण्याकरता गेलो असता तेथील आंदोलकांची माहिती घेतली. ३५० च्या आसपास युवक व युवतीचा या उपोषणामध्ये समावेश आहे. त्यातले १२ तारादुतांची शारीरिक परिस्थिती खुप खालवली असून त्यांना नजीकच्या हाॅस्पिटल मध्ये दाखल केले आहे. तर एका तारूदूत आंदोलकास ह्रदयविकाराचा झटका आल्याची माहिती कळाली. मराठा समाजाने मोठ्या संघर्षातून मिळवलेल्या सारथी संस्थेला बंद करू नका,असे आवाहन घाडगे यांनी यावेळी मराठा समाजाच्या वतीने सरकारला केले.

Loading...

तसेच, मराठा समाजाशी खेळ कराल तर मराठा क्रांती ठोक मोर्चा काय करू शकतो हे मागील काळात दिसले आहे. पुन्हा रस्त्यावर येण्यास भाग पाडू नका. तातडीने सारथी संस्थेचे कामकाज सुरु करा, असं मराठा ठोक मोर्चाच्या वतीने मी मराठा ठोक मोर्चाचा समन्वय या नात्याने सरकारला आवाहन करतो.’ असेही ते यावेळी म्हणाले.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश