शरद पवारांचा वाढदिवस साजरा करू नका, राष्ट्रवादीचे आवाहन

टीम महाराष्ट्र देशा – राज्यावर दुष्काळाचे सावट असल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी कुठलाही समारंभ करण्याऐवजी तो निधी किंवा मदत दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना दयावी असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस असतो, यावर्षी राज्यात दुष्काळ असल्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवशी आपल्या भागातील लोकांना शक्‍य असेल ती मदत करावी असेही पाटील यांनी म्हटले आहे.

आघाडीसाठी कॉंग्रेसने विलंब लावू नये – राष्ट्रवादी