fbpx

भावी मुख्यमंत्री म्हणू नका : अजित पवार

अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : पदांच्या उल्लेखामुळेच पाडापाडीचं राजकारण सुरु होतं आणि या पाडापाडीमुळेच आमची माती झाली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी बोलताना आपल्याला भावी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना भावी पंतप्रधान म्हणू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलंय.

भावी मुख्यमंत्री म्हणण्याअगोदर आघाडीचं बहुमत कसं मिळेल यावर लक्ष दिलं पाहिजे. भावी मुख्यमंत्री आणि भावी पंतप्रधान. या उल्लेखामुळे मित्र पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावू शकतात आणि त्यातून पाडापाडी होऊ शकते. त्यामुळे आघाडीला बहुमत कसं मिळेल याकडे अगोदर लक्ष द्यावं, असं आवाहन करून अजित पवार यांनी आघाडीतल्या मुख्यमंत्रीपदाच्या वादाची काळजी घेतली आहे.

 

 

1 Comment

Click here to post a comment