बॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन

टीम महाराष्ट्र देशा : पुलवामा येथील दहशतवादानंतर देशाभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तर पाकिस्तानी कलाकारांचा देखील धिक्कार होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाकिस्तानी कलाकारांच्या बाबतीत नेहमीच आक्रमक भूमिकेत असते. आता तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एफ एम रेडिओ वाहिन्यांना पाकिस्तानी गायकांचे गाणे रेडीओ स्टेशन वरून प्रसारित करू नका असा इशारा पत्राद्वारे दिला आहे.

पाकिस्तान हा देश नेहमीच दहशतवाद्यांना खत पाणी घालत असतो. तसेच भारतामध्ये दहशतवादी घटना घडवून आणत असतात तर दुसरीकडे पाकिस्तानी कलाकार आपला भिकार देश सोडून पोट भरायला भारतात येत असतात. पण आता भारतावर वेळोवेळी होणारे हल्ले आता भारत सहन करणार नाही आणि पाकिस्तानी कलाकारांना देखील येथे प्राधान्य देण्यात येणार नाही असा पवित्र भारता कडून घेतला जात आहे. असा पवित्राच मनसेने घेतला असून एफ एम रेडिओ वाहिन्यांना पाकिस्तानी गायकांच तुणतुणं वाजवण बंद करा असा कडक शब्दात इशारा दिला आहे.

भारतात सध्या स्फोटक वातावरण आहे तर रेडिओ वाहिन्या मात्र नुसरत फतेह अली खान, राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम, अली झफर, सज्जाद अली, गुलाम अली, रेश्मा, सफाकत अमानत अली यांसारख्या पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी भारतीयांना ऐकवतायत.