fbpx

‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको’

टीम महाराष्ट्र देशा- बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार काँग्रेसला नाही. संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसनं बाबासाहेबांना रोखलं होतं असा मुख्यमंत्र्यांनी चढविलेल्या या जोरदार हल्ल्याला कॉंग्रेस पक्षाने  देखील प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसला इंदू मिलची जागा बळकवायची होती असा जावईशोध राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे. बेताल वक्तव्ये, अप्रचार, खोटे बोलणे हा भाजपच्या निवडणूक रणनितीचा भाग आहे. आता निवडणुका आल्याचं आहेत तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते अशी वक्तव्ये सुद्धा त्यांच्याकडून ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

अनुसुचित जाती मोर्च्याच्या समारोपाप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस नागपूरात बोलत होते.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.इंदूमिलची जागा काँग्रेसला बळकवायची होती, असा आरोप देखील  यावेळी बोलताना केला.तसेच  संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसनं बाबासाहेबांना रोखलं होतं निवडणुकीत बाबासाहेबांना काँग्रेसनचं हरवलं होतं, अशा शब्दात  फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता

भाजपने अनुसूचित जातीसाठी मोठे काम केले आहे. काँग्रेसने फक्त त्यांचा ‘व्होटबँक’ म्हणून वापर केला आहे. काँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता. त्यामुळेच केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार असतानाही स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळू शकली नाही, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.