घाबरू नका हवा बदलत आहे – अजित पवार

पुणे : १९९९ साली शरद पवार साहेबांनी स्वाभिमानाने राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळीही पाऊस पडण्याची स्थिती होती मात्र त्यावेळी आणि आजही पाऊस थांबला आहे अशी आठवण पुण्यात होत असलेल्या हल्लाबोल सभेत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून दिली. तर औरंगाबादला हल्लाबोलची सभा सुरु असताना नेटवर्क बंद करण्यात आले होते. तर आजही पश्चिम महाराष्ट्रात हल्लाबोल होत असताना नेट बंद करण्यात आलं आहे. असा आरोप करत अजित पवार यांनी कोणीही सत्तेची मस्ती दाखवू नये असा सज्जड दम सरकारला भरला आहे.

तसेच कार्यकर्त्यांनो घाबरू नका हवा बदलत असल्याचं सांगत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजप- सेनेचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणाची गरज असल्याच देखील अजित पवार म्हणाले.

तर एवढे दिवस पंतप्रधान परदेशात जायचे आता मुख्यमंत्री जातात, यांना वाण नाही पण गुण लागले अस म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या परदेश वारीवर चांगलच तोंडसुख घेतल. शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यात महिलांवर दलितांवर अन्याय होत आहेत. सरकार गप्पबसून सगळ्या गोष्टी पाहत आहे. असा आरोप देखील अजित पवार यांनी केला.