आधी ‘ते’ करा, नाहीतर झेपत नाही म्हणून जाहीर करा; भाजप नेत्याचं ठाकरेंना थेट आव्हान 

uddhav thakrey vs bjp

मुंबई : गेली अनेक दशके महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटलेला नाही. कर्नाटकच्या सीमाभागात अनेक मराठी भाषिकांना गळचेपी सहन करावी लागत आहे. त्यांच्यावर अनेक प्रकारे अन्याय केला जातो. या मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सहभागी व्हायचं आहे. मात्र, त्यांचा हा अनेक दशकांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, ‘हा प्रश्न कोर्टात असेपर्यंत हा भाग केंद्रशासित का करत नाही? कर्नाटक सरकार कोर्टात बेलगाम वागत आहे. हा भाग केंद्रशासित झाला पाहिजे, यात कर्नाटक सरकारची मस्ती चालू देणार नाही’ असं ठणकावून सांगितलं आहे. उद्धव ठाकरे यांनी सीमाप्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील नेत्यांनी एकत्र येऊन ‘हा भाग महाराष्ट्रात येत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, ही प्रतिज्ञा घेऊया’ असं आवाहन देखील केलं आहे.

विवादित सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ‘बेळगावचा समावेश केंद्र शासित प्रदेशात व्हावा म्हणून सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जरूर करा, परंतु त्या आधी तुमच्या हाती असलेल्या राज्यात औरंगाबाद चे संभाजीनगर तर करा.. नाही तर झेपत नाही म्हणून जाहीर करा.’ असं खुलं आव्हानच त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या