टीम महाराष्ट्र देशा: आजकाल प्रत्येक दुसरी महिला तुटत्या केसांच्या (Hair fall) समस्येपासून त्रस्त आहे. बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे प्रामुख्याने या समस्यांना सामोरे जावे लागते. अशात स्त्रियांना त्यांचे केस सांभाळण्यास खूप कठीण जाते. त्यामुळे यावर त्वरित उपाय म्हणून महिला पार्लर मध्ये जाऊन हेअर स्पा (Hair Spa) करून घेतात. पण अनेकदा हेअर स्पा केल्याने तुमच्या केसांना फायद्याच्या ऐवजी नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे आज आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला घरगुती हेअर स्पा बद्दल माहिती सांगणार आहोत. या सोप्या पद्धतीच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी केसांची काळजी घेऊ शकता.
हेअर स्पा (Hair Spa) घरी करण्याच्या पद्धती
घरी हेअर स्पा करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम केसांना मसाज करून घ्यावी लागेल. केसांची मसाज करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइलचा वापर करू शकता. हे तेल कोमट करून नंतर हळूहळू केसांना मसाज करा. तेल कोमट करून केसांची मसाज केल्याने तुमचे केस निरोगी आणि मजबूत होतात.
यानंतर तुम्हाला तुमच्या केसांना स्टीम म्हणजेच वाफ द्यावी लागेल. यासाठी तुम्हाला एक टॉवेल गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यावा लागेल. हा टॉवेल गरम पाण्यामध्ये भिजवून घट्ट पिळून घ्या. त्यानंतर हा टॉवेल केसांना व्यवस्थित गुंडाळा. दहा ते पंधरा मिनिटे हा टॉवेल केसांमध्ये तसाच राहू द्या.
दहा ते पंधरा मिनिटानंतर केसांना वाफ दिल्यानंतर केसांमधून टॉवेल काढा. त्यानंतर कोणत्याही शाम्पूने किंवा आयुर्वेदिक शाम्पूच्या मदतीने केस धुवा. घरी हेअर स्पा करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, घरी हेअर स्पा करत असताना चुकूनही गरम पाण्याने किंवा कोमट पाण्याने केस धुवू नका. या दरम्यान गरम पाण्याने केस धुतल्याने केसांचे नुकसान होऊ शकते.
केस व्यवस्थित धुवून झाल्यावर तुम्हाला त्यावर तुमचे नियमित कंडिशनर लावावे लागेल. केसांना कंडिशनर लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कंडिशनर लावल्यावर टाळूंची मसाज करू नये. कारण टाळूची मसाज केल्याने केस गळती वाढू शकते, असे म्हटले जाते. घरी हेअर स्पा करताना कंडिशनर लावल्यानंतर सुमारे वीस मिनिट ते अर्धा तासानंतर केस धुवा.
या चार पद्धती व्यवस्थित फॉलो केल्याने तुमचे केस गळणे कमी होऊन मजबूत होऊ लागतील. पण घरी हेअर स्पा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, या हेअर स्पा पद्धती वापरण्यापूर्वी एकदा तज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्यवस्थित तज्ञांचा सल्ला घेतल्यावर तुम्हाला कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
महत्वाच्या बातम्या
- State Govt | मोठी बातमी! मंत्रीमंडळ विस्ताराचा अखेर मुहर्त ठरला, जाणून घ्या कधी होणार विस्तार
- Pratap Sarnaik | “मुख्यमंत्र्यांनी मला ९०० खोके दिलेत, पण…”, प्रताप सरनाईक यांचं खळबळजनक विधान
- Travel Tips | कुटुंबासोबत फिरायला जाण्यासाठी ‘ही’ आहेत भारतातील सर्वोत्तम ठिकाणं
- Raosaheb Danve | महाराष्ट्रात खरंच मध्यावधी निवडणुका लागणार? रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया
- Chandrashekhar Bawankule | “अजूनही 20-25 आमदारांचं आम्हाला छुपं समर्थन”; बावनकुळेंचं मोठं वक्तव्य