टीम महाराष्ट्र देशा: दररोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या तब्येतीसोबतच आपल्या केसांकडे Hair दुर्लक्ष करत असतो. धूळ प्रदूषण यामुळे आपल्या केसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वाढत्या प्रदूषणामुळे आपले केस दिवसेंदिवस खराब होऊ लागले आहेत. केसांची निगा राखण्यासाठी आपण अनेक केमिकल युक्त प्रोडक्टचा वापर करत असतो. पण केमिकल प्रोडक्ट शिवाय अनेक असे घरगुती उपाय आहे ज्यामुळे आपण आपल्या केसांची निगा राखू शकतो. त्याचबरोबर केसांची निगा राखण्यासाठी आपण घरच्या घरी हेअर स्पा (Hair Spa) देखील करू शकतो. कारण हेअर स्पा केल्याने आपले केस सुंदर आणि मऊ बनतात.
घरगुती हेअर स्पा (Hair Spa) टीप्स
केळी आणि ऑलिव्ह ऑइल
घरच्या घरी हेअर स्पा करण्यासाठी केळी आणि ऑलिव्ह ऑइलचा तुम्ही हेअर मास्क बनवू शकता. यासाठी तुम्हाला ऑलिव्ह ऑइल मध्ये केळी मिक्स करून घ्यावे लागेल. एक चमचा ऑलिव ऑइल घेऊन त्यात दोन चमचे दही घालून त्यामध्ये केळी आणि लव्हेंडर ऑईलचे दोन-तीन थेंब टाकून मिक्स करून घ्या. हे मिश्रण तयार झाल्यावर ते केसांना लावून वीस ते पंचवीस मिनिटे राहू द्या. त्यानंतर केस धुवा. यानंतर तुम्हाला तुमचे केस अधिक रेशमी जाणवायला लागतील.
ग्रीन टी
ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी नेहमी फायदेशीर असते त्याचबरोबर ग्रीन टी मुळे आपले केस देखील चांगले राहू शकतात. केसांची गळती कमी करण्यासाठी ग्रीन टी हेअर मास्क चा उपयोग करू शकतात. या हेयर मास्कसाठी तुम्हाला दोन चमचे किंवा दोन ग्रीन टी च्या गरम पिशव्या गरम पाण्यात टाकून झाकून ठेवून दहा मिनिटे उकळून घ्यावे लागतील. त्यानंतर हे उकळलेले द्रावण गार करून त्याची डोक्याच्या टाळूला मसाज करून अर्धा तास तसाच राहू द्या. यानंतर साध्या पाण्याने डोके धुवा. डोके धुतल्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक जाणवायला लागेल.
नारळाचे दूध
घरच्या घरी हेअर स्पा करण्यासाठी तुम्ही नारळाचे दूध हेयर मास्क म्हणून वापरू शकता. यासाठी तुम्हाला फक्त नारळाचे दूध घेऊन केसांवर त्याची मसाज करावी लागेल. मसाज झाल्यानंतर केसांना टॉवेल मध्ये किंवा एखाद्या कपड्यांमध्ये बांधून अर्धा तास तसेच ठेवून द्या. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुतल्यावर तुम्हाला तुमचे केस निरोगी आणि मजबूत जाणवायला लागतील.
व्हिनेगर
व्हिनेगर हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये दोन चमचे कंडिशनर एक चमचा ऑलिव्ह ऑइल आणि एक चमचा ग्लिसरीन मिक्स करावे लागेल. हे मिश्रण तयार झाल्यावर ते तुम्ही डोक्याला लावून वीस मिनिटं तसेच ठेवावे लागेल. यानंतर साध्या पाण्याने केस धुवून स्वच्छ कोरडे करून घ्या. यानंतर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक जाणवेल.
महत्वाच्या बातम्या
- Chitra Wagh । “नाच्या, सुपारीबाज, भाडोत्रींच्या….” ; चित्रा वाघ भास्कर जाधवांवर चांगल्याच संतापल्या
- Travel Tips | भारतात ‘या’ ठिकाणी होऊ शकते तुमची बजेट ट्रीप
- Bhaskar Jadhav । संजय राठोड प्रकरणावरुन भास्कर जाधवांनी केली चित्रा वाघ यांची नक्कल; म्हणाले…
- Viral Video | सायकलवर चित्तथरारक स्टंट करणाऱ्या ‘या’ तरुणाचा पाहा व्हिडिओ
- Ajit Pawar । “नव्याचे नऊ दिवस असतात मान्य, पण..”; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा