‘त्या’ लेटरबॉम्ब प्ररकणात अजित पवारांचीही सीबीआय चौकशी करा; भाजपची मागणी

ajit pawar

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे चर्चेत आहेत. सिंग हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आहेत सोबतच सिंग यांच्यावर देखील काही मंडळींनी गंभीर आरोप केल्याने त्यांचे नाव विशेष चर्चेत आहे.

सचिन वाझेनंतर परमबीर सिंग यांनी देखील लेटरबॉम्ब टाकून अनिल देशमुख यांच्यासह शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळील व्यक्तीचं नाव घेत गंभीर आरोप केले होते. यानंतर, भाजपने अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता, थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच सीबीआय चौकशीची मागणी भाजपने केली आहे. अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा, असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत मांडला गेला आहे.

काय आहे हा ठराव ?

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे सातत्याने उघडकीस येत आहेत. बदल्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याऐवजी हा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे धक्कादायक प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून चालू आहे. गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला. परमबीर सिंग यांच्या पत्राच्या आधारे अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकश अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, असा ठराव भाजपने मंजूर केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP