fbpx

‘मी सांगतो काहीही करा पण यापुढे साखर कारखानदारी नको’

Union Minister Nitin Gadkari

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यात आयोजित केलेल्या साखर परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘मी सांगतो काहीही करा पण यापुढे साखर कारखानदारी नको’ असं विधान केले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख हेही उपस्थित होते.

यावेळी बोलताना गडकरी यांनी ‘साखर कारखान्याचाच अनुभव माझ्यापेक्षा शरद पवार साहेबांना जास्त आहे. मी पण त्यात प्रयत्न केला आहे. पण मी सांगतो काहीही करा पण यापुढे साखर कारखानदारी नको असं म्हणाले. तसेच पुढे बोलताना साखर उद्योग वाढवायचा असेल तर इथेनॉल तयार केले तर साखर उद्योग वाढू शकतो. पेट्रोलियम मंत्रालय इथेनॉल खरेदी करू शकतो. साखर तयार केली तर विक्री होऊ शकत नाही. यामुळे पैसे फुकट जातात. जागतिक बाजारपेठेत आपल्या साखरेला मागणी कमी आहे. केंद्र राज्य मिळून सबसिडी देऊन साखर निर्यात केली जात आहे, असे गडकरींनी सांगितले.

दरम्यान, मी तीन कारखाने चालवण्याचं धाडस केलं, मात्र ते किती कठीण आहे ते आता कळालं आहे. मला कुणी विचारलं तर आता कारखानदारी करू नका असाच सल्ला देतो, असेही गडकरी म्हणाले.