fbpx

कितीही चौकशी करा तोंड बंद ठेवणार नाही : राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : कोहिनूर स्क्वेअर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. तब्बल ९ तास राज ठाकरे यांची बंद दाराआड ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी झाली. त्यानंतर रात्री ८ वाजता राज ठाकरे इडीच्या कार्यालयातून बाहेर पडले.

राज ठाकरे जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यानंतर ते घरी पोहोचले. त्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलताना राज ठाकरे यांनी ‘कितीही चौकशा केल्या, तरी तोंड बंद ठेवणार नाही’ असं विधान कार्यकर्त्यांसमोर केले. त्यामुळे राज ठाकरे हे या प्रकरणात दोषी नाहीत हे त्यांच्या वक्तव्यातून समोर येत आहे.

दरम्यान, राज ठाकरे हे आपल्या कुटुंबासह इडीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ‘राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला?, बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा? का सहनुभी गोळा करण्याचा हा प्रयत्न’ असं ट्वीट केले होते.

याला प्रत्युत्तर म्हणून ‘तुझ समाजिक कार्य घरी कराव. आम्हाला शहाणपणा शिकवू नका. तुझी राज ठाकरेंवर बोलण्याची लायकी ही नाही आणि कुवत देखील नाही आहे, अशा शब्दात रिटा गुप्ता यांनी अंजली दमानिया यांची लायकी काढली होती.