करुणानिधींची प्रकृती चिंताजनक, समर्थकांची रुग्णालयाबाहेर गर्दी

चन्नई : डीएमके पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांना पुन्हा एकदा प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 94 वर्षीय करुणानिधी गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. शुक्रवारी प्रकृतीतील सुधारणेनंतर त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र, मध्यरात्री 1.38 वाजता पुन्हा त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. रक्तदाब कमी झाल्याने त्यांना शारीरिक त्रास सुरु झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले. सध्या चेन्नईतील गोदावरी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Loading...

गुरूवारी अचानक कमी रक्तदाबाच्या समस्येमुळे करुणानिधी यांना कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयाने प्रसिद्ध केलल्या पत्रकात म्हटले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असून रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यात येत आहे, असेही सांगण्यात आले आहे.

करूणानिधी यांची प्रकृती रात्री जास्त खालावल्यानं डीएमके कार्यकर्त्यांनी त्यांच्या गोपाळपुरम निवासस्थानी एकच गर्दी केली आहे. मात्र कुणालाही त्यांना भेटू दिलं जात नाही. एमडीएमके प्रमुख वायको, तमिळनाडू भाजप अध्यक्ष तमिळीसाई सुंदरराजन आणि तमिळी नेते वेलमुरगन यांनीही करूणानिधी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खास ट्वीट करून करूणानिधींच्या प्रकृतीत आराम पडावा, अशा शुभेच्छा व्यक्त केल्यात.

चारा-छावणी घोटाळाप्रकरणी 176 संस्थांविरूध्द गुन्हे दाखलLoading…


Loading…

Loading...