एम. करुणानिधी यांना रुग्णालयातून घरी सोडले

नवी दिल्ली : द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम) चे प्रमुख एम. करुणानिधी यांचे ‘फीडिंग ट्यूब’ बदल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. करुणानिधी यांना आज सकाळी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.डिसेंबर महिन्यामध्ये करुणानिधी यांना ‘फीडिंग ट्यूब’ लावण्यात आल्या होत्या. त्या बदलण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.करुणानिधी यांची प्रकृती स्थिर असून संध्याकाळपर्यंत ते घरी जाऊ शकतात अशी माहिती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक एस. एस. अरविंदन यांनी दिली होती. मात्र काही वेळातच त्यांनी घरी सोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. डिसेंबरमध्ये करुणानिधी यांना श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं.

You might also like
Comments
Loading...