जोकोविचचे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे पुन्हा भंगले स्वप्न

जोकोविच

मुंबई : स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचे गोल्डन ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिले आहे. एका वर्षात चार मोठ्या स्पर्धा जिंकत कॅलेंडर स्लॅम पूर्ण करत इतिहासातील दुसरा खेळाडू बनण्याची संधी जोकोविचकडे होती. अमेरिकन ओपनमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात डॅनिअल मेदवेदेवने जोकोविचचे गोल्डन ग्रँड स्लॅम पटकावण्याची स्वप्न संपुष्टात आणले आहे.

अमेरिकन ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जोकोविचचा सामना डॅनिअल मेदवेदेवशी झाला. मेदवेदेवने जोकोविचला ६-४, ६-४, ६-४ अशा सरळ तीन सेट मध्ये पराभूत करत आपल्या कारकिर्दीतील २१वे ग्रँड स्लॅम पटकावले. १९६९ नंतर गोल्डन ग्रँड स्लॅम पटकावण्याची संधी जोकोविचकडे होती. मात्र टोकियो ऑलिम्पिकनंतर आता त्याला अमेरिकन ओपन मध्येही पराभव स्वीकारावा लागला आहे. हंगामातील चारही ग्रँड स्लॅम जिंकत कॅलेंडर ग्रँड स्लॅम पटकावण्याच्या अगदी एक पाऊल दूर असताना त्याला पुन्हा निराशा हाती लागली आहे.

सामना संपल्यावर मात्र मेदवेदने जोकोविचची माफी देखील मागितली आहे. तो म्हणाला ” सगळ्यात आधी मी तुमची आणि तुमच्या फॅन्सला सॉरी म्हणतो. आज जे झाले ते सगळ्यांना माहिती आहे. तो कशासाठी खेळत होता हेही सगळ्यांना माहिती आहे. मला फक्त इतके म्हणायचे आहे की तू आज आणि तुझ्या पूर्ण कारकिर्दीत दमदार कामगिरी केली आहे. मी हे कधीच कोणाला सांगितले नाही. पण मी आज ते सांगु इच्छितो. माझ्यासाठी, तू इतिहासातील महान टेनिसपटू आहेस”, यावर नेहमी हरल्यावर चिडणाऱ्या नोव्हाक जोकोविचने मात्र स्मित हास्य केले.

महत्वाच्या बातम्या :