विजेतेपद पटकावल्यानंतर जोकोविचने चिमुकल्या चाहत्याला दिली ही ‘भेट’

जोकोविच

मुंबई : रविवारी झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सार्बियाच्या नोव्हाक जोकोविचने ग्रीसच्या स्टिफानोसला पराभुत करत विजेतेपद पटकावले आहे. जोकोविचचे हे कारकिर्दीतील १९वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. तर फ्रेंच ओपन स्पर्धेतील हे त्याचे दुसरे जेतेपद आहे.

या सामन्यात विजय मिळवल्यानंतर विजेत्या जोकोविचने प्रेक्षकातील त्याच्या एका युवा चाहत्याला मोठी भेट दिली. जोकोविचने त्याचे टेनीस रॅकेट त्या चाहत्याला भेट म्हणून दिले. रॅकेट मिळाल्यानंतर चाहता आनंदाने वेडा होउन नाचु लागला. त्याचा आनंद साजरा करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहे. ही भेट तो चाहता अजिवन सांभाळुन ठेवेल. या चाहत्याविषयी बोलताना जोकोविच म्हणाला, ‘सामना सुरु असताना त्याचा आवाज मला सतत ऐकु येत होता. पहिल्या दोन सेट मध्ये मी पराभुत झालो तरी तो मला प्रोत्साहन देत होता. यादरम्यान त्याने मला रणनितीही सांगीतली होती. नकळतपणे त्याने मला प्रशिक्षण दिले होते.’ असे तो म्हणााला.

यावेळी पुढे बोलताना तो म्हणाला की,’त्या चाहत्याचा पाठींबा बघुन मला खुप आवडत होत. म्हणून मी सामना संपल्यानंतर माझे रॅकेट त्याला देण्याच निर्णय घेतला.’ या सामन्यात जोकोविचचा पहिल्या दोन सेटमध्ये पराभव झाला होता. मात्र नंतर जोकोविचने पुनरागमन करत अखेरचे तीन सेट जिंकून कारकीर्दीतील दुसरे फ्रेंच ओपन जिंकले. हा सामना जोकोविचने पाच सेटमध्ये ६-७(६), २-६, ६-३, ६-२, ६-४ असा जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या

IMP