स्टिफानोसला पराभुत करत जोकोविचने जिंकले फ्रेंच ओपनचे विजेतेपद

जोकोविच

मुंबई : रविवारी झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सार्बियाच्या नोव्हाक जोकोविचने ग्रीसच्या स्टिफानोसला पराभुत करत विजेतेपद पटकावले आहे. जोकोविचचे हे कारकिर्दीतील १९वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. तर फ्रेंच ओपन स्पर्धेतील हे त्याचे दुसरे जेतेपद आहे.

तब्बल ४ तास ११ मिनिटे चाललेल्या या सामन्यात जोकोविचने स्टिफानोसला ५ सेट मध्ये ६-७(६), २-६, ६-३, ६-२, ६-४ अशा फरकाने पराभुत केले. यासह त्याने करियर ग्रँडस्लॅम पुर्ण केले. करियर ग्रँडस्लॅम म्हणजे करियरमध्ये चार ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणे. अशी कामगीरी करणारा तो जगातील तिसराच खेळाडू आहे. यापुर्वी रॉय इमर्सन आणि रोड लेवर यांनी ही कामगिरी केली होती. रोड लोवर यांनी १९६२ आणि १९६९ साली हा कारनामा केला होता. तर जोकोविचने पहिल्यांदा २०१६ मध्ये ग्रँडस्लॅम पुर्ण केले होते.

तसेच १९वे ग्रँडस्लॅम जिंकत जोकोविच हा सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या दिग्गज खेळाडुंच्या यादीत स्वित्झर्लँडच्या रॉजर फेडवर व स्पेनच्या राफेल नदालच्या आणखी जवळ गेला आहे. या दोन्ही खेळाडुंनी प्रत्येकी २० वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. तर अंतिम सामन्यात पराभूत होणारा स्टिफानोस हा पहिलाच ग्रीक टेनिसपटू आहे, ज्याने ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

IMP