कोरोना काळातही दिवाळी गोड; हा कारखाना देणार कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस व सभासदांना १५ किलो साखर

sugar factory

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने बहुतांश उद्योग अडचणीत आले आहेत. कोरोनाच्या कठीण काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर कोणाला पगार कपातीला सामोरे जावे लागले. अशा काळात बोनस मिळणे तर दूरच.

मात्र, संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस आणि सभासदांना १५ किलो साखर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कामगार आणि सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.

ना.थोरात पुढे म्हणाले की, कामगारांना २० टक्के बोनस, ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान, सभासदांना १५ किलो साखर मोफत तर शेतकऱ्यांच्या ठेवींचे सुमारे दीड कोटी रुपये परत करण्याचा निर्णय कारखान्याने घेतला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वावर कारखान्याची वाटचाल सुरु असून, कारखान्याने कायम शेतकरी, कष्टकरी व सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत.

यावर्षी कोरोनाचे संकट व आर्थिक मंदी असतानाही कारखाने एफआरपीपेक्षा जास्त भाव दिला आहे, असे ना.थोरात म्हणाले. कारखान्यांमधील स्पर्धा लक्षात घेता आता थोरातांनी निर्णय घेतल्याने इतर कारखान्यांनाही आपापल्या कामगार आणि सभादांना काही ना काही दिलासा द्यावा लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-