दिवाळी स्पेशल- धनत्रयोदशीचे महत्व

दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे महत्व जाणून घ्या

धनत्रयोदशी

दिवाळीचा दुसरा महत्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी   माणूस दिवसभर कष्ट करून घाम गाळून पैसे कमावतो. त्या मिळवलेल्या पैशातून घरात समृद्धी यावी याकरता धनत्रयोदशीला फार महत्व आहे.शेतकऱ्यांच्या दृष्टीने खळ्यात लागलेल्या नवीन धान्याच्या राशी हेच त्यांचे धन.! ‘धान्य’ हा शब्द धन या शब्दातूनच उत्पन्न झाला असावा अशी कल्पना केल्यास ती चुकीची ठरू नये. ‘धन’रूपी ‘धान्य’ घरात आलेलं असतं. या नवीन नवीन धान्याची पूजा करण्याचा दिवस ती धनत्रयोदशी. शहरात आपण या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, घरातील सोनं-नाणं यांची पूजा करतो. नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद यालाही फार मोठे महत्त्व आहे. शहरात गुजराती-मारवाडय़ाच्या सहवासाने या दिवसाला सर्रास ‘धनतेरस’ असं म्हणू लागलेत अलीकडे.!! आयुर्वेदाचा उद्गाता धन्वंतरी याचा जन्मही याच दिवशी झाल्याची कथा आहे. म्हणून वैद्यजन या दिवशी धन्वंतरीची जयंती साजरी करतात.