टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सरकार ने ऐन दिवाळीत Diwali खुशखबर दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत सामान्य राज्यसेवेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली असून राज्य सरकारने इच्छुक उमेदवारांना जणू ही दिवाळीची भेट दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत सामान्य राज्यसेवेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 65 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांसाठी पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पात्रता उमेदवारांनी mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
MPSC यांच्यामार्फत विविध पदांच्या 65 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC यांच्या मार्फत विविध पदांच्या जागांसाठी बंपर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी पात्रधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. MPSC च्या रिक्त पदांमध्ये अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) पदाच्या जागा इत्यादी पदांचा समावेश आहे.
MPSC पदांसाठी शैक्षणिक पात्रता
MPSC यांच्यामार्फत राबविण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी या पदांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
अर्ज सुरू होण्याची तारीख
MPSC यांच्यामार्फत ही भरती प्रक्रिया इच्छुक उमेदवारांसाठी दिवाळीची भेट ठरली असून या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख 25 ऑक्टोबर 2022 पासून सुरु होणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत विविध 65 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असून या पदांसाठी इच्छुक उमेदवार 14 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.
महत्वाच्या बातम्या
- Keshav Upadhey | “…पण काही प्रश्नांची उत्तरे ही द्या”, केशव उपाध्ये यांचे उद्धव ठाकरेंना सवाल
- Uddhav Thackeray | “भाजपच्या मेहरबानीवर एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री पद टिकून आहे”
- IND vs PAK | मेलबर्नमध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला, सामन्याच्या वेळेपासून ते प्लेइंग 11, जाणून घ्या प्रत्येक अपडेट
- BJP | “2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपचा पराभाव होणार”, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं भाकीत
- Saamana | “शेतकऱ्यांनी गावं विकायला काढलीत, राज्यपालजी, आपल्याला माहितीय का?”, सामनामधून भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा