Share

ST. Employees | एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून ‘इतक्या’ हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर

ST. Employees | मुंबई : वर्षातला सर्वांच्या आवडीचा सण म्हणजेच दिवाळी (Diwali) काही दिवसांवर आला आहे. या सणामध्ये सर्वजण खरेदी, फराळ, त्याचबरोबर कामगारांना एक्स्ट्राचा दिवाळी बोनसही दिला जातो. याच पार्श्वभूमीवर  राज्य सरकारने (State Government) एसटी कर्मचाऱ्यांना (ST. Employees) बोनस (Bonus) देण्याचे जाहीर केले आहे. परंतू यावर्षी त्यांच्या बोनसमध्ये वाढ करण्यात आली असल्याची माहीती समोर आली आहे.यासाठी राज्य शासनाकडून 45 कोटी रुपये निधी एसटी महामंडळाला देण्याचा निर्णय झाला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST. Employees) दिवाळी बोनसमध्ये राज्य सरकारकडून वाढ

याआधी प्रत्येक वर्षी एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस फक्त अडीच हजार रुपये आणि अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये भेट दिली जात होती. मात्र आता सरकारच्या आदेशानुसार एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यंदा सरसकट पाच हजार रुपये दिवाळी भेट (Gift) मिळणार आहे. त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांना सहा टक्के महागाई भत्ताही मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

राज्य शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन 21 ऑक्टोबरला अदा करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही ऑक्टोबरचे वेतन दिवाळीआधीच देण्याचे आदेश काढण्याची मागणी एसटी महामंडळाकडे केली असल्याचं महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे (Sandeep Shinde) यांनी सांगितले आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी कॉंग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे (Shreerang barage) यांनीही शासनाकडून दिवाळी भेट म्हणून देण्यात आलेली 45 कोटी रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखी असल्याचीही टीका केली आहे. महागाई वाढली असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबरचे वेतन दिवाळीआधी देण्यात येणार असून तशाच प्रकारे वेतन एसटी कर्मचाऱ्यांनाही मिळावे आणि दिवाळीआधी महागाई भत्ताही मिळावा, अशी मागणी (Demand) त्यांनी केली असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

ST. Employees | मुंबई : वर्षातला सर्वांच्या आवडीचा सण म्हणजेच दिवाळी (Diwali) काही दिवसांवर आला आहे. या सणामध्ये सर्वजण खरेदी, …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai

Join WhatsApp

Join Now