Share

Diwali 2022 | यावर्षी दिवाळी लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त कधी आहे? जाणून घ्या

टीम महाराष्ट्र देशा: संपूर्ण देशात दिवाळी हा सण मोठ्या आनंदात आणि उत्सवात कार्तिक महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो. या सणाचा जल्लोष आणि उल्हास देशभर बघायला मिळतो. दिवाळीच्या दिवशी सर्वत्र दिव्यांच्या प्रकाशाने देश उजळून निघतो. सर्व धर्माचे लोक दिवाळी आनंदाने साजरी करतात. या दिवशी माता लक्ष्मी आपल्या भक्तांच्या घरी जाऊन त्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देते, अशी धार्मिक मान्यता आहे. तर, दिवाळीच्या दिवशी रावणावर विजय मिळवून भगवान श्रीराम 14 वर्षाचा वनवास करून अयोध्येत परतले होते असे म्हटले जाते. त्यामुळे दिवाळी दिवशी संपूर्ण अयोध्या दिव्यांनी सजविली जाते. हा दिवस लोक दिवे, मिठाई आणि लक्ष्मी पूजन करून साजरा करतात.

या वर्षी दिवाळी चा शुभ मुहूर्त कधी आहे?

यावर्षी 24 आणि 25 रोजी ऑक्टोबर दोन्ही दिवशी म्हणजेच कार्तिक महिन्यातल्या अमावस्येलाला दिवाळी साजरी केली जाणार आहे. यावर्षी 25 ऑक्टोबरला प्रदोष काळाच्या आधी अमावस्या तिथी संपत आहे. त्याचबरोबर 24 ऑक्टोबर रोजी प्रदूषकातील अमावस्या तिथी आहे. त्यामुळे यावर्षी 24 ऑक्टोबर रोजी देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे.

दिवाळी लक्ष्मी पूजन

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. पूजेमध्ये कलश मांडून कलशावर गंध लावून पूजा करावी. त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाचे हातात फुले आणि अक्षता घेऊन ध्यान करावे. ध्यान करून झाल्यावर हातातील फुले आणि अक्षता माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांच्या मूर्तींना अर्पण करावी. त्यानंतर दोन्ही मूर्ती संध्यापात्रामध्ये ठेवून दूध, दही, मध आणि जल यांनी त्यांचा अभिषेक करावा.

अभिषेक झाल्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाच्या मूर्तीला गंध लावून माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांना हार घालावा. यानंतर देवांसमोर नैवेद्य फळे पैसे आणि सोन्याचे दागिने असेल तर ते ठेवावे. त्यानंतर सर्वांनी मिळून माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची कथा ऐकून त्यांची आरती करून त्यांच्या आशीर्वाद घ्यावे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: संपूर्ण देशात दिवाळी हा सण मोठ्या आनंदात आणि उत्सवात कार्तिक महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो. या सणाचा …

पुढे वाचा

Diwali Artical

Join WhatsApp

Join Now