टीम महाराष्ट्र देशा: देशात सगळीकडे दिवाळीची धूम सुरू आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत खरेदी विक्रीचा जोर वाढला आहे. दिवाळीसाठी लोकांनी कपडे, दागिने इत्यादी गोष्टींची तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर प्रत्येकजण दिवाळीमध्ये आपले घर सुशोभित बनवण्यामध्ये लागले आहे. त्यासाठी देखील लोकांची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे. लाइट्स, फुले शोभेच्या वस्तू इत्यादी सजावटीच्या गोष्टींकडे लोक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. घराबरोबरच घराचे मुख्य प्रवेशद्वार दिवाळीमध्ये आकर्षित कसे दिसेल यावर लोकांची तयारी सुरू झाली आहे. कारण दिवाळीमध्ये मुख्य द्वारातून प्रवेश करतात घरात सणाचा उत्साह दिसला पाहिजे, असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे आम्ही या बातमीमध्ये तुम्हाला दिवाळी दरम्यान घराचा मुख्य दारवाज्याला कशी सजावट करायची याबद्दल माहिती सांगणार आहोत.
खालील गोष्टींच्या मदतीने दिवाळीची सजावट बनवा आणखी आकर्षक
- दिवाळी म्हटलं तर आपल्याला सगळीकडे आकर्षित करणारे रंग बघायला मिळतात. या रंगांमध्ये प्रामुख्याने भडक रंगांचा समावेश असतो. त्यामुळे दिवाळीच्या सजावटीसाठी शक्यतो लाल, भडक गुलाबी, केशरी, हिरवा, निळा इत्यादी रंग वापरावे. त्याचबरोबर फुलं, रांगोळी आणि मेणबत्ती साठी देखील तुम्ही हे रंग वापरू शकतात. कारण हे रंग तुमची सजावट अजून आकर्षक बनवतात.
- दिवाळी आणि इतर सणासुदींच्या दिवसांमध्ये रांगोळी हे मुख्य आकर्षण असते. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या मुख्य प्रवेशद्वाराकडे रांगोळी काढण्यासाठी किती जागा आहेत ते बघून त्यानुसार फुलांची सजावट करा. रांगोळीच्या आसपास तुम्ही दिव्यांनी सजावट करू शकता किंवा फक्त दिव्यांची सुद्धा रांगोळी काढू शकतात.
- घराचे मुख्य प्रवेशद्वार अधिक आकर्षक बनवण्यासाठी त्याला फक्त रांगोळी काढूनच सोडून देऊ नका तर तिला तुम्ही पोम-पॉम्प्स, मोती आणि मिरर वर्कने देखील सजवू शकतात. या गोष्टींच्या मदतीने तुम्ही शुभ दीपावली, ओम किंवा स्वस्तिक काढून वेगवेगळ्या डिझाईन बनवू शकतात.
- घराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी जर पायऱ्या असतील तर त्या पायऱ्यांना तुम्ही फुलांच्या माळांसह सजवू शकतात किंवा त्या पायऱ्यांच्या कोपऱ्यावर दिवे लावून तेथे सजावट करू शकता. यामुळे प्रवेशद्वारासह संपूर्ण जिना आकर्षक दिसेल.
- दिवाळीमध्ये घराचे मुख्य प्रवेशद्वार सजावटीसाठी तुम्ही इंडोअर प्लास्टिकची मदत घेऊ शकतात. यामध्ये प्रामुख्याने मोठी पाने असलेली झाडे चांगले दिसतील. या भोवती तुम्ही दिवे किंवा छोटीशी रांगोळी काढून देखील ती सजवू शकतात. त्याचबरोबर दरवाज्याच्या कोपऱ्यावर तुम्ही फ्लोटिंग मेणबत्ती ठेवून त्याला अधिक आकर्षित बनवू शकतात.
- घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जर नेमप्लेट असेल तर त्याच्याभोवती तुम्ही सजावट करू शकतात. त्यासाठी तुम्ही गोटा,लेस आणि बांगड्यासोबत छोट्या घंटा वापरून सजावट करू शकतात.
- घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सजावटीसाठी तुम्ही पितळी भांडी देखील वापरू शकतात. या भांड्यांमध्ये पाणी भरून तुम्ही त्यामध्ये फुल किंवा आकर्षित करणारे झाडे लावू शकतात.