टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सध्या सर्वत्र सणासुदीचे वातावरण तयार झालेले आहे. सगळीकडे दिवाळीची लगबग सुरू झालेली असून खरेदी विक्रीचा जोर देशातील बाजारपेठत वाढला आहे. दिवाळी हा सण भारतामध्ये साधारणता चार दिवस साजरा करतात. धनत्रयोदशी पासून दिवाळीला सुरुवात होते. हा दिवस खूप शुभ मानला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची आणि विदयेची पूजा केली जाते. याच दिवशी यमाच्या नावाने दिवा दान केला जातो. धनत्रयोदशीचा दिवस सोने, चांदी, कपडे, वाहन इत्यादी गोष्टी खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी केलेल्या गोष्टींमध्ये सुख आणि समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया यावर्षी धनत्रयोदशीच्या दिवस कोणता आहे आणि धनत्रयोदशी कोणत्या शुभ मुहूर्तावर साजरी करावी.
धनत्रयोदशी 2022
पंचांगानुसार, धनत्रयोदशी कार्तिक महिन्यातील त्रयोदशी तिथी 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06.02 वाजता सुरू होत आहे. तर, 23 ऑक्टोबर 2022 रोजी म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्रतयोदिवशी संध्याकाळी 06.03 वाजता समाप्त होणार आहे. पुरातन काळापासून धनत्रयोदशीची पूजा प्रदोष काळातच केली जाते आणि त्रयोदशीची तिथी 23 ऑक्टोबरला संपते तेव्हाच प्रदोष कालावधी सुरू होते. म्हणूनच यावर्षी 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे.
यावर्षी धनत्रयोदशीच्या पूजेचे शुभ मुहूर्त
यावर्षी 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी धन, सोने, चांदी इत्यादी गोष्टींची पूजा केली जाते. त्याचबरोबर कपडे, सोने, वाहने इत्यादी गोष्टी खरेदी करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. यावर्षी 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या पूजेच्या शुभ मुहूर्त संध्याकाळी 7.10 ते 08.24 पर्यंत आहे.
2022 धनत्रयोदशीच्या शुभ योग
यावर्षी भारतात 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी व्यापारी आपल्या हिशोबांच्या पुस्तकाची कुबेर देवांची पूजा करून त्यांच्याकडे आपली संपत्ती वाढण्याची प्रार्थना करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी स्त्री पुष्कर आणि चंद्र योग तयार होत आहे. हे दोन्ही योग धनसंपत्ती वाढण्यासाठी शुभ मानले जातात.
महत्वाच्या बातम्या
- Historical moment | भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास! सलग 7व्यांदा जिंकला आशिया कप
- Deepak Kesarkar | ‘50 खोके एकदम ओक्के’ म्हणून डिवचणाऱ्या ठाकरे गटावर दीपक केसरकरांचा हल्ला
- Ajit Pawar | एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला झटका! अजित पवारांनी मंजूर केलेला निधी शिंदे-फडणवीस सरकारने रोखला
- Diwali 2022 | दिवाळीच्या दिवशी आकर्षक दिसण्यासाठी ‘हे’ कलर कॉम्बिनेशन करा आपल्या जोडीदारासोबत
- Deepak Kesarkar | “दोन दिवसांनंतर अवघ्या महाराष्ट्राला समजेल की खोके कोणी घेतले अन्…”, दीपक केसरकरांचा इशारा
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले