Share

Diwali 2022 | दिवाळीची मिठाई खरेदी करत असाल, तर या गोष्टींची नक्की काळजी घ्या

टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या सणासुदीची वर्दळ सुरू आहे. लवकरच दिव्यांचा आणि उत्साहाचा सण दिवाळी साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकांची सर्वत्र खरेदीची धूम पसरलेली आहे. या दिवसांमध्ये बाजारात खरेदी विक्रीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दिवाळी जशी जवळ येते तसं तसं कपडे, फटाके, दिवे, मिठाई इत्यादी प्रकारच्या वस्तूंची खरेदी वाढत चाललेली आहे. बाजारात सर्वत्र मिठाईचे ढीग बघायला मिळत आहे त्याचबरोबर दुकान रंगबिरंगी आणि स्वादिष्ट मिठाई यांनी सजलेली आहे. पण या आकर्षित करणाऱ्या मिठाईंमध्ये भेसळीचा जोर यांना खूप वाढला आहे. त्यामुळे तुम्ही या मिठाईकडे आकर्षकहो तुमच्या सणाच्या आनंदात अडचण निर्माण करू नका. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून मिठाई खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी हे सांगणार आहोत. यामुळे तुमची दिवाळी आनंदी आणि सुरक्षित होईल.

बनावटी मिठाईपासून सावध राहा

तुम्ही बाजारात मिठाई खरेदी करायला गेल्यावर तुम्हाला रंगीबेरंगी मिठाई आकर्षित करते. पण तुम्ही या रंगीबेरंगी मिठाईकडे आकर्षक व्हायचे नाही तर सुंदर दिसणाऱ्या मिठाई पासून दूर राहायचे आहे. कारण या मिठाईमुळे एलर्जी, किडनीचे आजार आणि श्वासांच्या आजारांना सामोरे जाऊ शकते. तुम्हाला तुमचा दिवाळी सण आनंदात साजरा करायचा असेल तर या रंगीबेरंगी मिठाईची खरेदी टाळा.

मिठाई वरची चांदी बघून आकर्षित होऊ नका

बाजारामध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मिठाईवर मोठ्या प्रमाणात चांदीचे काम दिसून येते. हे चांदीचे काम अतिशय तेजस्वी आणि आकर्षक दिसते. हे चांदीचे काम बघून असे वाटते की खरंच या मिठाईवर चांदीचे काम. परंतु तुम्ही त्याच्याकडे आकर्षित न होता त्या मिठाई कडे दुर्लक्ष करायचे आहे. कारण आजकाल भेसळ करणारे मिठाई मध्ये चांदी ऐवजी ॲल्युमिनियम चा वापर करतात जे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे चांदीचे काम बघून गोंधळून न जाता त्या मिठाई खरेदी करणे टाळा.

भेसळयुक्त दुधाच्या मिठाई पासून सावध राहा

सणासुदीच्या काळात मुख्यता दिवाळीमध्ये मिठाईंमध्ये भेसळयुक्त दुधाचा सर्रासपणे उपयोग केला जातो. त्यामुळे अशा परिस्थितीत दिवाळीची मिठाई करताना विश्वासू आणि चांगल्या दुकानातूनच खरेदी करावे. मिठाईच्या माव्यामध्ये दुधाची पावडरची भेसळ करणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. तुम्हाला जर माव्यामध्ये दुधाची भेसळ समजून घ्यायची असेल तर त्या माव्यामध्ये आयोडीनचे एक दोन थेंब टाकून पहा. माव्याचा रंग निळा झाला तर समजून घ्या की या माव्यामध्ये भेसळयुक्त दूध आहे. त्यामुळे दिवाळीत घरीच मिठाई बनवण्याचा प्रयत्न करा कारण बाजारामध्ये तुम्हाला भेसळयुक्त मिठाई मिळण्याची शक्यता भरपूर आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या सणासुदीची वर्दळ सुरू आहे. लवकरच दिव्यांचा आणि उत्साहाचा सण दिवाळी साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे …

पुढे वाचा

Diwali Artical

Join WhatsApp

Join Now