Share

Diwali 2022 | दिवाळीच्या दिवशी आकर्षक दिसण्यासाठी ‘हे’ कलर कॉम्बिनेशन करा आपल्या जोडीदारासोबत

Diwali 2022 । टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशामध्ये सगळीकडे सणासुदीची धूम सुरू आहे. त्यामुळे भारतीय बाजारामध्ये खरेदी विक्रीचा जोर वाढला आहे. सर्वत्र सणासुदीची तयारी सुरू झालेली असून नवीन कपड्यांच्या खरेदीला देखील सुरुवात झाली आहे. सणासुदीला नवीन कपडे खरेदी करायचा आणि नवीन कपडे परिधान करायची प्रथा भारतामध्ये आधीपासूनच आहे. फक्त त्यात बदल म्हणून नवीन फॅशन आयडियाची भर पडली आहे. यामध्ये नवीन कपडे घालून जोडप्यांना नेहमी उठून आणि आकर्षक दिसायचे असतो. त्यासाठी अनेक जोडपे जोडी म्हणून वेगळे दिसण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी जोडपे समान कलरचे कलर कॉम्बिनेशन करतात तर कधी कॉन्ट्रास्ट रंग घालायचे निवडतात. जर तुम्ही दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्या जोडीदारासोबत कोणत्या रंगाचे कपडे घालून आकर्षक दिसायचे आहे असा विचार करत असाल तर ही बातमी वाचून तुमच्या प्रश्न दूर होईल. कारण या बातमीमध्ये आम्ही आपल्या जोडीदारांसोबत तुम्ही कोणते रंग घालू शकता याबद्दल माहिती सांगणार आहोत.

निळा आणि सोनेरी कलर कॉम्बिनेशन । Diwali 2022

निळा आणि सोनेरी रंगाचे कॉम्बिनेशन आजकाल ट्रेनिंग मध्ये आहे. जर दिवाळीच्या दिवशी तुम्ही या कलरचा कॉम्बिनेशन निवडले तर तुमचा लूक अजून खास आणि अधिक आकर्षक दिसेल. यामध्ये पुरुषांना निळा कुर्ता आणि सोनेरी रंगाचा पैजामा परिधान करावा. आणि महिलांनी सोनेरी वर्क असलेली निळी साडी परिधान करावी. या कलर कॉम्बिनेशन ने तुमची जोडी अगदी उठून दिसेल.

Diwali 2022 । सोनेरी, हिरवी आणि लाल कलर कॉम्बिनेशन 

सणसदीच्या दिवसांमधील लोक भडक रंगाचे कपडे परिधान करायचे निवडतात. त्यामध्ये मुख्यतः लाल रंगाचा समावेश असतो. लाल रंगाला महिला सणसणीच्या दिवसांमध्ये विशिष्ट पसंती देतात. दिवाळीच्या दिवशी तुम्ही लाल रंग सोनेरी किंवा हिरव्या रंगासोबत एकत्र करून घालू शकतात. यासोबतच पुरुष गोल्डन शेरवानी आणि महिला गोल्डन साडीचे कॉम्बिनेशन लाल आणि हिरव्या रंगासोबत करून देखील घालू शकतात.

गुलाबी आणि सोनेरी कलर कॉम्बिनेशन । Diwali 2022

गुलाबी रंग हा महिलांचा आवडता रंग आहे असे आपण नेहमी म्हणत असतो. कारण गुलाबी रंग हा नेहमी उठून दिसतो. या सणासुदींच्या दिवसांमध्ये महिलांचं पुरुष देखील गुलाबी रंग परिधान करून आकर्षक दिसू शकतात. गुलाबी रंगासोबत सोनेरी रंगाचे कॉम्बिनेशन करून पुरुष कुर्ता पायजमा आणि स्त्रिया साडी परिधान करू शकतात. या कलर कॉम्बिनेशन मुळे दोघे एकत्र बाहेर गेल्यावर जोडी उठून दिसेल.

महत्वाच्या बातम्या 

Diwali 2022 । टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशामध्ये सगळीकडे सणासुदीची धूम सुरू आहे. त्यामुळे भारतीय बाजारामध्ये खरेदी विक्रीचा जोर वाढला …

पुढे वाचा

Diwali Artical

Join WhatsApp

Join Now