मंत्री असावा तर असा, प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या एसीतल्या ‘बाबूंना’ दिवाकर रावतेंचा झटका

टीम महाराष्ट्र देशा: सरकारी काम आणि सहा महिने थांब, या वाक्याप्रमाणे सामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी सरकारी कार्यालयात जोडे झिजवावे लागतात. अनेकवेळा शासनामधीलच एका कार्यालयाला दुसऱ्या कार्यालयाची मदत न झाल्याचे प्रसंग पहायला मिळाले आहेत. मात्र एखाद्या अधिकाऱ्याने अथवा मंत्र्याने सतर्कता दाखवत कारवाईची बडगा उगारल्यास काय होते, याचा अनुभव राज्य परिवहन मंडळातील अधिकाऱ्यांना सध्या येत आहे.

झाल असं की, बुलढाण्यातील जळगाव- जामोद बसस्थानकात लावण्यात आलेले अनेक पंखे नादुरुस्त होते. उन्हाळ्यामध्ये प्रवाशांची गैरसोय होत असल्याने अनेकदा स्थानिक अधिकाऱ्यांकडून तक्रार करण्यात आली होती. दोन महिन्यापूर्वी नवीन पंखे बसवून देण्याचा प्रस्ताव मुंबईतील मुख्य भांडार व खरेदी विभागाकडे पाठवण्यात आला होता. प्रस्ताव पाठवताना तातडीची बाब असल्याचे नमूद देखील करण्यात आले होते.

Loading...

आपल्या सवयीप्रमाणे मुंबई एसीमध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी नवीन पंखे बसवण्याच्या प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला. दरम्यान, हा सर्व प्रकार परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांना समजला, रावते यांनी दखल घेत सुस्थ अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी प्रस्तावावर कार्यवाही करण्यास विलंब लावणाऱ्या कार्यालयाची वीज जोडणी तोडण्याचे आदेश दिले. आपल्या कार्यालयाची वीज बंद होताच अधिकाऱ्यांना घाम फुटला.

दरम्यान, रावते यांनी कारवाईची बडगा उगारताच अधिकारी कामाला लागले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली