पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या दिव्या वर्पे आणि कश्मिरा हुलावळे या सुवर्णकन्यांनी दैदिप्यमान कामगिरी केली असून त्या शहराचा क्रीडा विषयक नावलौकिक वृध्दींगत करतील असा विश्वास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने इंद्रायणीनगर येथील दिव्या वर्पे यांचा इजिप्त देशात होणा-या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेकरीता निवड झाल्याबद्दल तसेच कश्मिरा सुनिल हुलावळे यांचा जिम्नॅस्टीक मध्ये मेजर ध्यानचंद राष्ट्रीय ऍवार्ड मिळाल्याबद्दल महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, नगरसदस्या झामाबाई बारणे, नम्रता लोंढे, स्वीकृत सदस्य दिनेश यादव, माजी नगरसदस्य योगेश लोंढे, सामाजिक कार्यकर्ता शिवराज लांडगे, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आणि कश्मिराचे वडील सुनिल हुलावळे आणि आई राजश्री हुलावळे तसेच दिव्या वर्पे यांचे पालक उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या इजिप्त देशात १८ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर रोजी होणा-या जागतिक किक बॉक्सिंग स्पर्धेकरीता भारतीय किक बॉक्सिंग महासंघाकडून आपल्या शहरातील दिव्या वर्पे हिची महाराष्ट्रातून एकमेव निवड झालेली असून ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. तसेच कश्मिरा हुलावळे हिने देखील महाराष्ट्रातून एकमेव राष्ट्रीय पुरस्कार मिळविला आहे. या दोघींचीही कामगिरी कौतुकास्पद असून यांना प्रोत्साहन देणारे त्यांचे आई वडील, क्रीडा शिक्षक, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचेदेखील महापौर माई ढोरे यांनी कौतुक केले.
महत्त्वाच्या बातम्या
- पाठीत खंजीर खुपसणारे कोण असं म्हटल्यावर आता दोन चेहरे डोळ्यासमोर येतात – चंद्रकांत पाटील
- ‘तुम्ही केलेला गुन्हा सामान्य नाही’ ; न्यायालयाचा आसाराम बापूला ‘सर्वोच्च’ धक्का
- पिंपरी-चिंचवडकरांना राज्य सरकारचं मोठं गिफ्ट; राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी उभी करणार
- ‘GDP वाढला म्हणजे Gas, Diesel, Petrol च्या किंमतीत वाढ’, राहुल गांधींचा मोदींना टोला
- ‘मोदी हे आमचे आई बाप; तुमच्या आई बापाला शिव्या दिलेलं चालेल का ?’