राहुल गांधींना सोशल मिडीया ‘बुस्टर’ देणारी दिव्या स्पंदना

टीम महाराष्ट्र देशा: आजवर ज्यांची पप्पू म्हणून चेष्टा केली जायची ते कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला डोईजड होताना दिसत आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुका आणि नंतरच्या अनेक राज्यातील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला सपाटून पराभवाला समोर जाव लागल आहे. यातील मुख्य कारण होत ते भाजपची ताकद असणारा सोशल मिडिया प्रचार. एका बाजूला सोशल मिडीयावरून भाजप आणि त्यांचे ट्रोल कॉंग्रेसला जड जात होते तर दुसरीकडे कॉंग्रेसकडील कमकुवत सोशल मिडिया विंग भाजपचा सामना करू शकत नव्हती. मात्र आज गुजरात विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी आणि कॉंग्रेसला असा काही बुस्टर मिळाला आहे कि भाजपसाठी ते डोईजड होत आहेत. याच मुख्य कारण म्हणजे काँगेसचा सोशल मिडिया हाताळनारी व्यक्ती म्हणजे ‘राम्या’

३४ वर्षीय राम्या साउथ चित्रपटातील अभिनेत्री आहे, त्याचं खर नाव हे दिव्या स्पंदना आहे.

२०१२ मध्ये राम्याने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.कर्नाटकमधील लोकसभेच्या एका जागेवरील पोटनिवडणुकीत राम्या विजयी झाल्या. मात्र २०१४ च्या मोदी लाटेत त्यांना हार पत्करावी लागली.

राम्याचे @Divya Spandana/Ramya नावाने ट्विटर वर अकांउट असून जवळपास 5 लाख ९८ हजार lok त्यांना फॉलो करतात

राम्याने सोशल मिडीया विंगची जबाबदारी घेतल्यापासून कॉंग्रेसबाबत फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मिडियावर लोकांचे मत सकारात्मक होत आहे.

महागाई, पेट्रोलचे वाढते भाव, जीएसटी, नोटाबंदी आणी सरकारच्या इतर निर्णयावर कॉंग्रेसने भाजपला चांगलेच खिंडीत पकडले आहे. याचे श्रेय राम्यालाच जाते

विकास हरवला आहे आणि विकास वेडा झाल आहे याच कैंपेन देखील कॉंग्रेसच्या डिजिटल विंगनेच तयार केल होते. जे आज देशभारत चांगलच व्हायरल होत आहे.