सिल्लोड : कन्नड विभागीय कार्यालयाचे विभाजन करण्यात आले आहे. यामुळे आता सिल्लोडला स्वतंत्र कार्यालयाची मंजूरी मिळाली आहे. कन्नडला महावितरणचे विभागीय कार्यालय असल्याने तेथे शेतकरी तसेच वीज ग्राहकांची खुप गैरसोय होत होती. त्यामुळे सिल्लोडला स्वतंत्र कार्यालय होण्यासाठी महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वत: शासनाकडे पाठपुरावा केला. सिल्लोड, सोयगाव या दोन तालुक्यातील वीज ग्राहकांना होणारा त्रास आता थांबणार आहे. त्यामुळे या वीज ग्राहकांना आता सिल्लोडमध्येच काम होणार आहे. दरम्यान कन्नडला जाण्यासाठी आर्थिक तसेच शारिरीक त्रास आता होणार नाही.
नवीन नियमानुसार कार्यालये : सद्या असणारे कन्नड विभागीय कार्यालयाचे विभाजन करुन कन्नड – सिल्लोड असे दोन स्वतंत्र कार्यालय केले. सिल्लोड उपविभागाचे विभाजन करुन सिल्लोड १, सिल्लोड २, असे दोन उपविभाग असणार आहेत. तर कन्नड विभागात कन्नड, वैजापूर, पिशोर हे तीन विभाग या निर्णयानुसार असणार आहेत.
७ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबईतील महावितरणच्या कार्यालयामध्ये ऑनलाइन बैठक झाली. या वेळी कन्नड विभागीय कार्यालयात जाण्यासाठी कशी गैरसोय होते या बाबत चर्चा केली. दोन विभाग वेगळे केले तर ग्राहकांना त्याचा फायदा कसा होवू शकतो हे मंत्री सत्तार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या बाबतचा प्रस्ताव ताबडतोब तयार करुन पाठवण्याचा प्रस्ताव उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यवस्थापकीय संचालक औरंगाबाद येथे पाठवला होता. हा प्रस्ताव डॉ. नितीन राऊत यांनी ते तातडीने मंजूर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या नावाखाली महाविकास आघाडी सरकारला काहीच करायचं नाही – दरेकर
- Breaking : पुण्यातील राष्ट्रवादीच्या आमदाराला कोरोनाची लागण !
- शबनमला फाशी दिली तर अनर्थ ओढावेल; महंत परमहंसांचा इशारा
- मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- मास्क न घातल्यास रिक्षा होणार जप्त, पोलिसांचा मोठा निर्णय