दिवाकर रावते म्हणतात कोण तो अमित शहा ?

टीम महाराष्ट्र देशा : ‘आगामी निवडणुकीसाठी शिवसेना सोबत आली तर ठिक नाहीतर, त्यांना आस्माना दाखवू.’ असे वक्त्व्य गेल्या आठवड्यात लातूर येथे झालेल्या सभेत अमित शहा यांनी केले होते. यावरून शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकांवरुन देशभरातील राजकीय वातावरण आतापासूनच तापायला लागले आहे.

यातच भाजप आणि शिवसेनेची युती टिकणार की तुटणार? हा चर्चेचा विषय ठरत आहे. यातच आता कराड ( जि. सातारा) येथील एका कार्यक्रमात परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते यांनी विचारलेल्या कोण अमित शहा? या प्रश्नावरुन राजकीय वातावरण आणखीनच तापले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कराड येथील नूतन बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते झाला. या सोहळ्यानंतर पत्रकारांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लोकसभेच्या जागांसंदर्भात केलेल्या वक्तव्यबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना प्रश्न विचारला असता त्यांनी कोण अमित शहा ? असा प्रतिप्रश्न पत्रकारांनाच केला.

पत्रकारांनी पुन्हा भाजपचे अध्यक्ष अमित शहा असे संगितल्यावर परिवहन मंत्री रावते यांनी ते भाजपचे अध्यक्ष आहेत का ? असा पुन्हा प्रतिप्रश्न करून अमित शहांना महत्त्व दिले नाही. यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध ताणले असल्याचेच दिसून येत आहेत. त्यांनी पत्रकारांच्या या प्रश्नाला बगल देऊन उत्तर देण्याचेही टाळले.

You might also like
Comments
Loading...