एक शिट्टी मारायचा अवकाश की, सीमेवर लाखोंची फौज जमेल ; दिवाकर रावतेंचा संघाला टोला

टीम महाराष्ट्र देशा : काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेळ पडल्यास भारतीय लष्करापेक्षा जलदगतीने सैन्य उभारणी करू शकतो, असे म्हटले होते. याचा शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. दिवाकर रावते यांनी बुधवारी नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

आता पाकिस्तानची भीती बाळगण्याची कोणतीही गरज नाही , सीमेवर लढण्यासाठी सैन्य भरतीची आणि सैनिकांना प्रशिक्षित करण्याचीही गरज नाही. फक्त एक शिट्टी मारायचा अवकाश की, सीमेवर लाखोंची फौज जमेल असा उपरोधिक टोला दिवाकर रावते यांनी मोहन भागवत यांना लगावला आहे.

दरम्यान स्वबळावर लढण्याचा इरादा केलेल्या शिवसेनेने आत्तापर्यंत संघावर टीका करण्याच टाळल होत, मात्र रावते यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना भाजपसह संघाला शिंगावर घेण्याच्या तयारीत दिसत आहे.